Superintendent of Police : पठारे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Superintendent of Police : पठारे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांकडे मागणी

0
Superintendent of Police : पठारे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Superintendent of Police : पठारे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा; पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Superintendent of Police : नगर: अहिल्यानगर शहरातील सिध्दार्थनगर, म्युनिसिपल कॉलनी येथील रहिवाशांनी गंभीर मारहाणीच्या (Severe Beating) घटनेप्रकरणी पोलीस अधीक्षकांची (Superintendent of Police) भेट घेत संबंधित संशयित आरोपी पठारे टोळी विरूध्द मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

निवेदनात म्हटले आहे की,

यासंदर्भात सुनिता भीवसेन घोरपडे यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १४ मार्च २०२६ रोजी शेजारील व्यक्तींशी किरकोळ वाद झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता.१५ मार्च) घोरपडे कुटुंबीय माहिती घेऊन परतत असताना काही संशयित आरोपींनी त्यांना समझोत्याच्या बहाण्याने झेडपी कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावले. तेथे विजय पठारे, अजय पठारे व इतरांनी एकत्र येत घोरपडे यांचा मुलगा अविनाश याच्यावर तलवार, कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपी विरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद (Superintendent of Police)

संबंधित संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच घटनेनंतर मागील २३ दिवसांपासून आरोपी पसार असून ते कुटुंबीय व साक्षीदारांना धमक्या देत आहेत. या पसार संशयित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.