Fraud : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तब्बल साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक

Fraud : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तब्बल साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक

0

Fraud : नगर : अहिल्यानगर शहरात शेअर मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तब्बल साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पैसे परत देण्यास टाळाटाळ

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर येथील ओंकार संतोष हसे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी कंत्राटदाराने मोठी रक्कम गुंतवली. मात्र, कालांतराने संशयित आरोपीने विविध कारणे सांगत पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू (Fraud)

अखेर संशय आल्याने फिर्यादीने अधिक चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.