Sujay Vikhe Patil : प्रस्तावित रेल्वे मालधक्क्याच्या अन्यायाविरोधात नागरिकांनी उठवला आवाज; सुजय विखे पाटील यांची भेट

Sujay Vikhe Patil : प्रस्तावित रेल्वे मालधक्क्याच्या अन्यायाविरोधात नागरिकांचा आवाज; सुजय विखे पाटील यांची भेट

0
Sujay Vikhe Patil : प्रस्तावित रेल्वे मालधक्क्याच्या अन्यायाविरोधात नागरिकांनी उठवला आवाज; सुजय विखे पाटील यांची भेट
Sujay Vikhe Patil : प्रस्तावित रेल्वे मालधक्क्याच्या अन्यायाविरोधात नागरिकांनी उठवला आवाज; सुजय विखे पाटील यांची भेट

Sujay Vikhe Patil : श्रीरामपूर : परिसरात प्रस्तावित रेल्वे मालधक्का (Railway Goods Shed) प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल रेल्वेकडून अतिक्रमण (Encroachment) हटविण्याच्या नोटिसा देण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना अचानक विस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याने तसेच प्रस्तावित मालधक्क्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे व स्थानिक नागरिकांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी नागरिकांनी स्पष्टपणे मांडणी करत सांगितले की, प्रस्तावित रेल्वे मालधक्का प्रकल्पाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबाचे विस्थापन होऊ नये, यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्यात यावा.

नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मालधक्क्यामुळे धूळ, दुर्गंधीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम

तसेच, सर्वसामान्य कुटुंबांचे निवासस्थान सुरक्षित राहावे याबरोबरच प्रस्तावित रेल्वे मालधक्क्यामुळे उडणारी धूळ, दुर्गंधी व वाढते प्रदूषण यामुळे स्थानिक रहिवाशी, शाळा–कॉलेजमधील विद्यार्थी तसेच रुग्णालयातील रुग्ण यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
म्हणूनच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून रेल्वे मालधक्का हा गावाच्या बाहेरील भागात उभारण्यात यावा व यासाठी विखे कुटुंबाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ची विनंती करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा (Sujay Vikhe Patil)

यावेळी खासदारांकडून नागरिकांच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन देण्यात आले असून, या विषयात योग्य तो तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले. नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत अन्यायकारक विस्थापन सहन केले जाणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


या प्रसंगी तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, प्रसाद कटके, युवराज घोरपडे, गणेश भाडंगे, अभिजित मोरे, मुबारक शेख, भागवत घुगे, सोमनाथ पवार, राहुल शेटे, काळे पाटील आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.