Ahilyanagar Municipal Corporation | अहिल्यानगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत घनकचरा विभागाने मारली बाजी

0

Ahilyanagar Municipal Corporation |  नगर : अहिल्यानगर महापालिकेतर्फे (Ahilyanagar Municipal Corporation) पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला होता. सर्व सामन्यांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली आणि खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

या संघांचा सहभाग (Ahilyanagar Municipal Corporation)

या स्पर्धेत पदाधिकारी, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, प्रशासकीय कार्यालय ‘अ’ (आयुक्त यशवंत डांगे), प्रशासकीय कार्यालय ‘ब’ (उपायुक्त मेहेर लहारे), प्रभाग समिती कार्यालय एक (राहुल साबळे), प्रभाग समिती कार्यालय दोन (अमोल बोजा), प्रभाग समिती कार्यालय तीन (श्याम शिंदे), प्रभाग समिती कार्यालय चार (हबीब शेख), शिक्षण विभाग (अक्षय शिंदे), घनकचरा विभाग (शुभम उपलची), आरोग्य विभाग (डॉ. सतीश राजुरकर) आदी संघांनी सहभाग घेतला.

हे वाचा – राहुरीत एमआयडीसी उभारणार; युवकांना अक्षय कर्डिले यांचे रोजगाराचे आश्वासन

प्रभाग समिती क्रमांक दोनचा संघ उपविजेता (Ahilyanagar Municipal Corporation)

स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रभाग समिती कार्यालय दोन व तीन यांच्यात अटीतटीची लढत झाली, ज्यामध्ये प्रभाग समिती कार्यालय दोनने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रशासकीय कार्यालय ‘ब’ व घनकचरा विभाग यांच्यात रोमांचक सामना रंगला, ज्यात घनकचरा विभागाने विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. अंतिम सामना घनकचरा विभाग व प्रभाग समिती कार्यालय क्रमांक दोन यांच्यात रंगला. या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घनकचरा विभागाने विजेतेपद पटकावले, तर प्रभाग समिती क्रमांक दोन संघ उपविजेता ठरला.

हे पहा – इराणसोबतची चर्चा का फिस्कटली? अमेरिकेनं सांगितलं…

या स्पर्धेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिकतेची भावना जपत खेळाचा मनसोक्त आनंद घेतला. कामाच्या ताणतणावातून बाहेर पडत क्रीडांगणावर सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या कलागुणांना वाव दिला. क्रीडा अधिकारी व्हिन्सेंट फिलिप्स यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व खेळाडू व सहभागींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here