ZP School : पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; खरेदी-विक्रीतून मुलांनी शिकले अर्थकारणाचे धडे

ZP School : पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; खरेदी-विक्रीतून मुलांनी शिकले अर्थकारणाचे धडे

0
ZP School : पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; खरेदी-विक्रीतून मुलांनी शिकले अर्थकारणाचे धडे
ZP School : पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; खरेदी-विक्रीतून मुलांनी शिकले अर्थकारणाचे धडे

ZP School : पाथर्डी : शहरातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत (ZP School) विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी बाजार’ (Anandi Bazaar) या उपक्रमाने शिक्षणाला व्यवहाराची जोड देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान, उद्योग-व्यवसायाची जाणीव आणि आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या या आनंदी बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत विविध आकर्षक स्टॉल्स उभारले. घरातून तसेच स्थानिक दुकानांतून खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांनी विक्रीसाठी (Buying and Selling) मांडणी केली. स्टॉल्सची सजावट, ग्राहकांना आकर्षित करण्याची पद्धत आणि विक्री कौशल्य यात विद्यार्थ्यांनी विशेष कौशल्य दाखवले.

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत उत्पादनांची दिली माहिती

या बाजारात वडापाव, भजे, पॅटीस, पाणीपुरी, पोहे, भेळ, समोसा, सोयाबीन चिल्ली, विविध फळे, कोल्ड्रिंक्स, बंद खाद्यपदार्थांचे पॅकेट, चॉकलेट, बिस्किट यांसारख्या पदार्थांसह काही नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांचाही समावेश होता. विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत आपल्या उत्पादनांची माहिती दिली आणि विक्री वाढविण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (ZP School)

या उपक्रमाला पालक आणि शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांचा आस्वाद घेतला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्यांना प्रोत्साहन मिळाले.आनंदी बाजार च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खरेदी-विक्रीचे तंत्र, पैशाचे व्यवस्थापन, नफा-तोटा, मुद्दल यांसारख्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे आत्मसात केल्या. दिवसअखेरीस मिळालेल्या रकमेची जुळवाजुळव करताना त्यांनी आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक धडे शिकले, जे त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटशिक्षण अधिकारी निलेश गुंड, विस्ताराधिकारी शिवाजी कराड, रामनाथ कराड यांचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका नंदा तुपे यांच्या नेतृत्वाखाली मंदा पालवे, छाया चंदनशिव, ज्योती जाधव, सुरेखा बडे, मनीषा फटांगरे, भावना देवरे, कविता शिरसाट आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.