Ladaki Bahin Yojana KYC : लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?

0
Ladaki Bahin Yojana KYC : लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?
Ladaki Bahin Yojana KYC : लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?

नगर : जळगावमधून (Jalgaon) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या (Ladaki Bahin Yojana KYC) बहाण्याने गोकुळ चव्हाण या व्यक्तीने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी (Demand for physical intimacy) केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने आणखी एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे ३८ वर्षीय गोकुळ रमेश चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता नेमकं हे प्रकरण काय आणि हा गोकुळ चव्हाण कोण आहे हे सविस्तर जाणून घेऊ…

नक्की वाचा: सूरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ; ‘असा’ असणार अंत्ययात्रेचा मार्ग

समोर आलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची असल्याचे सांगून गोकुळ चव्हाण महिलेच्या घरी गेला आणि कागदपत्रे घेत शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर त्याने आणखी  एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो, असं म्हणत प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गोकुळ चव्हाण फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.

अवश्य वाचा: रुपाली चाकणकरांची बहीण शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली, खरात विषयी काय बोलणार?

प्रकरण नेमकं काय? (Ladaki Bahin Yojana KYC )

गोकुळ चव्हाण याच्याविरोधात एका ३५ वर्षीय पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, या महिलेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ या दोन महिन्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले नव्हते. त्यासाठी या महिलेला केवायसी करायची होती. तिने तिच्या पतीचे मित्र असलेल्या गोकुळ चव्हाण यांना केवायसी करण्याचे  सांगितले. २५ जानेवारी २०२६ रोजी केवायसी साठी कागदपत्रे घेण्यासाठी गोकुळ चव्हाण या महिलेच्या घरी आला. कागदपत्र घेतल्यावर चव्हाण याने लाडकी बहिण योजनेचे काम करून देतो, पण शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी या महिलेकडे केली. कोणालाही माहीत पडू देणार नाही, असे देखील चव्हाण महिलेला यावेळी म्हणाला.

महिलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर तिच्या पतीने गोकुळ चव्हाण याला समज दिली आणि पुन्हा घराकडे येऊ नकोस, अशी तंबी दिली. त्यानंतरही गोकुळ चव्हाण पुन्हा पुन्हा महिलेच्या घरासमोर उभा राहून तिला बघायचा, तिचा पाठलाग करत होता. या प्रकाराला कंटाळून आठ एप्रिल रोजी महिलेने गोकुळ चव्हाण यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापूर्वी देखील पीडित महिला राहत असलेल्या परिसरातील अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो, असे म्हणत चव्हाण याने प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गोकुळ चव्हाण नेमका कोण? (Ladaki Bahin Yojana KYC )

गोकुळ चव्हाण हा सामाजिक कार्यकर्ता असून त्याचे जळगाव शहरात ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पतीचा मित्र असल्याने पीडित महिलेने त्याला केवायसी करण्यासंदर्भात माहिती सांगितली होती. त्याच दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.