Stamp Duty | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीतून उपलब्ध झालेल्या नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कापोटी (Stamp Duty) शासनाच्या तिजोरीत ४६० कोटी ७८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा सहनिबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाला उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले नाही.
नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू
उद्दिष्टाच्या तुलनेत ८५.३२ टक्केच महसूल (Stamp Duty)
शेतजमीन, सदनिका, प्लॉट, फ्लॅट आदींची खरेदी-विक्री करताना खरेदी खत, साठेखत, भाडेकरार, बक्षीसपत्र, गहाण खत आदींच्या माध्यमातून मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरणे बंधनकारक आहे. या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत महसुलीरुपी कर जमा होतो. राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्हा सहनिबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाला १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षांसाठी ५४० कोटींचे महसुली उद्दिष्ट दिले. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी जिल्ह्यातील १७ दुय्यम निबंधक कार्यालये असून, या आर्थिक वर्षात या कार्यालयांच्या माध्यमातून शेतजमीन, सदनिका, प्लॉट, फ्लॅट आदींच्या खरेदी-विक्रीसाठी १ लाख २६ हजार ७०२ दस्तनोंदणी झाली. या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीपोटी शासनाच्या तिजोरीत ४६० कोटी ७८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. महसुली उद्दिष्टाच्या तुलनेत ८५.३२ टक्केच महसूल जमा झाला आहे.
हे वाचा – राहुरीत एमआयडीसी उभारणार; युवकांना अक्षय कर्डिले यांचे रोजगाराचे आश्वासन
आर्थिक वर्ष निहाय महसुली जमा (Stamp Duty)
२०२३-२४ – ४२९.३६ कोटी
२०२४-२५ – ४४१ कोटी
२०२५-२६ – ४६०.७८ कोटी



