Gavathi Katta : नगर : भिंगार कॅम्प पोलीसांनी (Bhingar Camp Police Station) गावठी पिस्टल (Gavathi Katta) बाळगून फिरणाऱ्या एका हद्दपार व्यक्तीला जेरबंद केले आहे. ही कारवाई (Arrested) सोमवारी (ता.१३) रोजी करण्यात आली. आकाश संजय पवार (वय २६, रा. ब्रम्हतळे नागरदेवळे, ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू
गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहिती
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याची सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बाराबाभळी शिवारात नगर-पाथर्डी रोडवरील एका हॉटेल समोर एक संशयित व्यक्ती कंबरेला गावठी पिस्टल लावून फिरत आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ तपास पथकाला घटनास्थळी पाठवून कारवाईचे आदेश दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पथकाने तत्काळ कारवाई करत जागीच पकडले (Gavathi Katta)
तपास पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला असता काही वेळातच संशयित व्यक्ती तेथे येताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला जागीच पकडले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीला १६ एप्रिल २०२४ पासून दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीही त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून परिसरात वावर केल्याचे उघड झाले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, योगेश पवार तसेच पोलीस कर्मचारी विलास गारुडकर, रामनाथ डोळे आणि प्रमोद लहारे यांच्या पथकाने केली आहे.



