Cultural Department : कर्जत : दादा पाटील महाविद्यालयात महात्मा फुले (Mahatma Phule) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती सप्ताहनिम्मित ११ ते १४ एप्रिल या कालावधीत सांस्कृतिक विभागाच्यावतीने (Cultural Department) विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सोमवारी (ता. १३) ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले असून १४ तास अखंड वाचन करण्याात आले.
नक्की वाचा : सूरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ; ‘असा’ असणार अंत्ययात्रेचा मार्ग
१४ तास अखंड वाचन
शनिवार (ता. ११) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. १२ एप्रिलला इतिहास व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. तर १३ एप्रिला ग्रंथालय विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व १४ तास अखंड वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उदघाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?
वाचनाशिवाय पर्याय नाही (Cultural Department)
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले की, महामानव घडण्यासाठी बहुतांशी सामाजिक परिस्थिती व त्यांच्या वाचनात येणारी पुस्तके यावर अवलंबून असते. वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाने मेंदूची मशागत होते. पुस्तकाशी मैत्री घट्ट ठेवा. मनापासून वाचन करा असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तर प्रा. नारायण मेंगाळ यांनी आभार मानले.



