Somnath Gharge : अहिल्यानगरमध्ये गोहत्येला पूर्णविराम; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा स्वामी त्रिवेद्रानंद सरस्वतीजींच्या हस्ते सन्मान

Somnath Gharge : अहिल्यानगरमध्ये गोहत्येला पूर्णविराम; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा स्वामी त्रिवेद्रानंद सरस्वतीजींच्या हस्ते सन्मान

0

Somnath Gharge : नगर : क्षेत्रफळाने विशाल असलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यामध्ये गोवंशाचे रक्षण करण्यासाठी आणि गोहत्या पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस (Police) प्रशासनाने राबवलेली मोहीम कौतुकास्पद ठरत आहे. पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) सोमनाथ घार्गे यांच्या कामगिरीची दखल घेत श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी त्रिवेद्रानंद सरस्वती जी महाराज (श्रीक्षेत्र ईंदू वासिनी गड,पिंपळनेर) यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांचा विशेष सत्कार केला.

हेही वाचा : कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाची कारवाई

‘अहिल्यानगरचा पॅटर्न’ संपूर्ण राज्यासाठी आदर्श

सत्कार प्रसंगी बोलताना स्वामीजी भावूक झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. स्वामीजी म्हणाले की, “राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरी, त्याची खऱ्या अर्थाने आणि कडक अंमलबजावणी अहिल्यानगर जिल्ह्यात सोमनाथ घार्गे यांनी करून दाखवली आहे. आज आम्हाला बाहेर कुठेही गेल्यावर अभिमानाने अहिल्यानगरचे उदाहरण द्यावे लागते.अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आज छत्रपती संभाजीनगर सारख्या इतर शहरांनाही आहे.”

नक्की पहा : समता नागरी पतसंस्थेत ईडीचे पथक दाखल

गोमाता ही केवळ प्राणी नसून विश्वाची माता (Somnath Gharge)

स्वामीजींनी यावेळी शास्त्रातील दाखले देत गोमातेचे महत्त्व विशद केले.”आपल्या धर्मशास्त्रानुसार पाच मातांपैकी गोमाता ही एक मुख्य माता आहे. ‘गावो विश्वस्य मातरम्’ या उक्तीप्रमाणे गाईचे रक्षण करणे हेच सर्वश्रेष्ठ धर्मकार्य आहे. पोलीस प्रशासनाने हे पवित्र कार्य करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे,” असे प्रतिपादन स्वामीजींनी केले.या गौरव सोहळ्यावेळी स्वामीजींसोबत वारकरी संप्रदायातील आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते:ह.भ.प. बाळकृष्ण महाराज ईलग,ह.भ.प. रामेश्वर महाराज आव्हाड,तुकाराम विघ्ने
मल्हारी विघ्ने,यावेळी एलसीबीचे (LCB) पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला.पोलीस दलाने केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील गो-प्रेमी आणि धार्मिक क्षेत्रातून आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here