The judge:श्रीगोंदा: कोणतेही मोठे यश मिळवण्यासाठी महानगरातच जन्म घ्यावा लागतो किंवा बड्या घराण्याची पार्श्वभूमी लागते, हा समज श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील शीतल नानासाहेब थोरात हिने खोटा ठरवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शीतलने ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळवून न्यायाधीश (The judge) पदाला गवसणी घातली आहे.
अवश्य वाचा- आयपीलच्या मैदानात हैदराबादसमोर आज राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना राजस्थान जिंकणार?
प्राथमिक शिक्षण हंगेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत (The judge)
शीतलचे प्राथमिक शिक्षण हंगेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये मिळणाऱ्या संस्कारांमुळेच आपला पाया भक्कम झाला, असे ती अभिमानाने सांगते. त्यानंतर हंगेश्वर विद्यालयात माध्यमिक आणि शिरूर येथील विद्या धाम प्रशालेत उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून तिने कायद्याच्या शिक्षणासाठी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विधी शाखेची पदवी घेतल्यानंतर न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शीतलने अभ्यासाला सुरुवात केली. यावेळी तिला कौटुंबिक स्तरावर मोठे पाठबळ लाभले. न्यायाधीश असलेले तिचे मामा दादासाहेब म्हस्के, अॅड. उत्तम ढवळे आणि चुलते सुभाष थोरात यांनी तिला सातत्याने तांत्रिक आणि मानसिक मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा आणि स्वतःच्या अभ्यासातील सातत्याचा परिणाम म्हणून अवघ्या तीन वर्षांत तिने हे यश संपादन केले. हंगेवाडी गावाने नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. गावात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांमुळे आज गावातील मुले प्रशासकीय आणि न्यायिक सेवांमध्ये उच्च पदावर जात आहेत. शीतलच्या या निवडीमुळे गावातील मुलींपुढे एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगी जेव्हा कायद्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसते, तेव्हा ती संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरते.



