Financial Fraud : बनावट शिक्षक भरती प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल; खोट्या नियुक्ती आदेशावरून दांपत्याची आर्थिक लूट

Financial Fraud : बनावट शिक्षक भरती प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल; खोट्या नियुक्ती आदेशावरून दांपत्याची आर्थिक लूट

0
Financial Fraud : बनावट शिक्षक भरती प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल; खोट्या नियुक्ती आदेशावरून दांपत्याची आर्थिक लूट
Financial Fraud : बनावट शिक्षक भरती प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल; खोट्या नियुक्ती आदेशावरून दांपत्याची आर्थिक लूट

Financial Fraud : पाथर्डी : शिक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दांपत्याची तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक (Financial Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) दोन जणांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. याबाबत रुपेशकुमार राम बागडे (वय ३९, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

३० लाख रुपयांची मागणी

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ किरण बागडे याचा मित्र सुभाष माणिक खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी, सध्या पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर) याने २०२२ मध्ये त्यांच्याशी संपर्क साधून जालना येथील संत कबीर विद्यालयाशी संलग्न असलेल्या सांची प्राथमिक विद्यालय, चेतनानगर येथे शिक्षक पदाच्या जागा असल्याचे सांगितले. या जागांवर नियुक्ती करून देण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपये, अशा एकूण ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर खेडकर याने संस्थाचालक लिंबराज रामचंद्र जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याशी भेट घडवून आणली. दोघांनी मिळून नोकरी निश्चित असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शासनाने संस्थेची मान्यता रद्द केल्याचे समोर (Financial Fraud)

यानंतर रुपेशकुमार राम बागडे यांनी वेळोवेळी रोख, आर टी जी एस आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण १८ लाख ५० हजार रुपये दिले. तसेच दोघांना बनावट नियुक्ती आदेशही देण्यात आले. त्या आधारे रुपेशकुमार बागडे व त्यांच्या पत्नीने काही काळ शाळेत कामही केले. मात्र, त्यांना कोणताही पगार मिळाला नाही.दरम्यान, चौकशी केली असता संबंधित संस्थेची मान्यता शासनाने रद्द केल्याचे समोर आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली.

फसवणूकीचा गुन्हा दाखल

आतापर्यंत आरोपींकडून ५ लाख रुपये परत मिळाले असून उर्वरित १३ लाख ५० हजार रुपये देण्यास नकार देत फोनही उचलत नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी सुभाष खेडकर व लिंबराज जाधव यांच्याविरोधात संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव हे करत आहेत.