Message Scam : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज

Message Scam : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज

0

Message Scam : श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) वितरणात सध्या एक नवीनच प्रकार समोर येत असून, यामुळे सर्वसामान्य ग्राहक (Customers) त्रस्त झाले आहेत. ग्राहकांच्या घरात गॅसची टाकी अद्याप पोहोचलेली नसतानाही, त्यांच्या मोबाईलवर “सिलेंडर यशस्वीरित्या वितरित झाले” असा संदेश (Message Scam) येत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

नक्की वाचा : अशोक खरातला खाऊ घातले ‘शेणाचे लाडू’; अहिल्यानगरमध्ये अनोखे आंदोलन

ग्राहकांचे चक्र कोलमडले

श्रीगोंदा तालुक्यात सध्या गॅस वितरणाचा हा अनोखा प्रयोग पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या घरात रिकामी टाकी तशीच असताना, त्यांच्या मोबाईलवर “सिलेंडर पोहोचले” असा मेसेज येत आल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. सामान्यतः गॅस मिळाल्यावर ग्राहकाने ओटीपी (OTP) दिल्यानंतरच डिलिव्हरी पूर्ण मानली जाते. मात्र, श्रीगोंद्यात एजन्सीचे कर्मचारी किंवा चालक ग्राहकापर्यंत न पोहोचताच सिस्टीममध्ये ‘डिलिव्हरी’ची नोंद करत आहेत. मेसेज आल्यामुळे ग्राहकाच्या नावावर सबसिडी जमा होते, पण प्रत्यक्षात गॅस मिळत नाही. जेव्हा गॅस मिळतो, तेव्हा तो उशिरा मिळाल्याने ग्राहकांचे चक्रच कोलमडले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एजन्सी धारकांकडून नियमांना हरताळ (Message Scam)

तालुक्यात मोजक्याच पाच ते सहा एजन्सी असल्याने या सर्वांनी मिळून ग्राहकांना गृहीत धरले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. श्रीगोंद्यात एजन्सी धारकांकडून नियमांना हरताळ फासला जात आहे. ग्राहकाने जाब विचारल्यास न पटणारे कारण सांगून वेळ मारून नेली जाते. पण हा तांत्रिक बिघाड नसून पद्धतशीरपणे केलेली ‘डिजिटल लुटमार’ आहे.