Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

0
Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Madhi : पाथर्डी : अमावास्येनिमित्त मढी (Madhi) येथे श्री कानिफनाथांच्या संजीवन समाधी (Shri Kanifnath’s Sanjeevan Samadhi) दर्शनासाठी गुरुवारी सायंकाळपासूनच नाथभक्तांची मोठी गर्दी उसळली. शुक्रवारी दिवसभर ही गर्दी अधिक वाढल्याने मढी परिसर अक्षरशः भक्तांनी दुमदुमून गेला. सकाळी तिसगाव-मढी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

नक्की वाचा : राहुरीच्या पोटनिवडणूकीसाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी

भर उन्हातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाही भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी मढी देवस्थानतर्फे गडावर मंदिर परिसरात मंडप व ताडपत्रीचे आच्छादन उभारण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान प्रशासनाने मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. देवस्थानतर्फे व्हीआयपी,मोफत मुखदर्शन व मोफत दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती.

Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Madhi : अमावास्येनिमित्त मढीत उसळली नाथभक्तांची गर्दी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शुक्रवारी सायंकाळपर्यंत गर्दी कायम (Madhi)

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मढी येथील श्रीराम चौकापासून गेटपर्यंत वाहने पार्किंगमध्ये वळवून पुढील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात नियमितपणे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून आले. अमावस्या गुरुवारी रात्री सुरू होऊन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असल्याने दिवसभर भाविकांची गर्दी कायम होती. प्रशासन आणि देवस्थान समितीने केलेल्या उपाययोजनांनंतरही मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे काही ठिकाणी गैरसोयी निर्माण झाल्या.