Financial Fraud Case | जालना मर्चंट बँकेची कोट्यवधीची फसवणूक करणारा कुरंगळला अटक; ८ दिवस पोलीस कोठडी

0
Economic Offences Wing
Economic Offences Wing

Financial Fraud Case | नगर : जालना येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेची बनावट वेअर हाऊस तारण पावत्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Financial Fraud Case) करणारा रायचंद सखाराम कुरंगळ यास आर्थिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे वाचा – कर्जत-जामखेड मतदारसंघात दोन लाख ७३ हजार मतदारांची एसआयआर प्रक्रिया पूर्ण

पावतीवर मालधारकांचे नाव (Financial Fraud Case)

यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पंचमुखी वेअर हाऊस या फर्मचा मालक रायचंद सखाराम कुरंगळ याने मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेसोबत करारनामा केलेला असून, ज्यात त्याने वेअर हाऊसमध्ये कर्जदारांचा माल साठवुन घेतल्यानंतर पावतीवर मालधारकांचे नाव, माल गोडावुनमध्ये ठेवल्या बाबतचा वेअर हाऊसमधील मालाचा टॅग क्रमांक, संबंधीत मालाला टॅग लावून त्यावरील पावती क्रमांक, माल ठेवल्यानंतर पंचमुखी वेअर हाऊसने दिलेल्या पावत्याआधारे कर्जाची प्रक्रिया करुन संबधीत मालधारकांना मोतीराम अग्रवाल मर्चंट बँकेच्या संबधीत शाखा कर्ज वितरीत करत होत्या.

अवश्य वाचा- LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

कर्जाचा नियमित भरणा (Financial Fraud Case)

बँकेच्या न्यू मार्केट यार्ड, भोकरदन, अंबड, देऊळगाव राजा, गेवराई आणि मंठा शाखेतील मालधारकांनी त्यांचा शेतमाल पंचमुखी वेअर हाऊसचा मालक रायचंद सखाराम कुरंगळ याने बाजार समितीच्या न्यू मार्केट यार्डमधील अॅग्रो प्रोसेसिंग झोन प्लॉट क्रं. ३ सर्वे नं. १८१ यांच्याकडे नियमाप्रमाणे जमा केला असल्याच्या पावत्या पंचमुखी वेअर हाऊसचा मालक कुंरगळ याने दिल्यामुळे त्या आधारे मोतीराम अग्रवाल मर्चेंट बँकेने १७७ मालधारकांना कर्ज दिलेले आहे. त्यापैकी १३३ खातेदारांनी कर्जाचा नियमित भरणा न केल्याने ते थकबाकीदार झालेले आहेत.

कर्जाची परतफेड (Financial Fraud Case)

अशा थकबाकीदारांना बँकेने वेळोवेळी नोटीसा देवून कर्जाची परतफेड करण्याबाबत सांगीतले होते. मात्र, ते कर्ज भरत नसल्याने बँकने संबंधीत मालधारक कर्जदारांच्या मालाच्या लिलावाची प्रक्रीया सुरु केली असता मालपारक कर्जदारांसह पंचमुखी वेअर हाऊसचा मालक रायबंद कुरंगळ याने अडथळा करून लिलाव होयु दिला नाही. तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी रायचंद कुरंगळ बास संपर्क साधुन पंचमुखी देअर हाऊसमधील मालधारक कर्जधारकांच्या मालाची पाहणी करायची असल्याचे सांगितले. मात्र, त्याने आज-उद्या म्हणत मालधारक कर्जधारकांचा तारण असलेला माल दाखविण्यास टाबाटाक करीत २ महिने लावले. त्यामुळे संबंधीत कर्जदारांचा माल कुरंगळच्या वेअर हाऊसमध्ये नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांना समजले.

पोलीस कोठडी सुनावण्यात आली (Financial Fraud Case)

याप्रकरणी बँकचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंदनझीरा पोलीस ठाण्यात रायचंद कुलंगक याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. दरम्यान, आरोपी रायचंद सखाराम कुरंसक (मूळ रा. सिंदखेडराजा, ह. मु. चौधरीनगर, मंठा रोड जालना) हा येथून फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण करीत माहिती मिळवली असता तो श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) हद्दीत असल्याची कळाले. त्यानुसार पथकाने श्रीगोंदा येथून त्यास अटक करून काल बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा जालन्यात आणले. आज गुरुवारी (ता. १६) त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यास ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे पहा – Facebook वर 1 क्लिक करणं महागात; पुणेकर काकांचे सव्वा कोटी एकदम गायब

ही कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्नाल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन पुगे, फौजदार शैलेश म्हस्के, जामदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेल, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, श्रेयस वाधमारे, चालक पाठक मेजर, महिला जमादार जयश्री निकम आणि मंदा नाटकर यांच्या पथकाने पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here