Heatwave | अहिल्यानगर जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ 

0

Heatwave | नगर : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार १७ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची (Heatwave) शक्यता वर्तवण्यात आलेली असून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले.

हे वाचा – कर्जत-जामखेड मतदारसंघात दोन लाख ७३ हजार मतदारांची एसआयआर प्रक्रिया पूर्ण

नागरिकांनी काय करावे ? (Heatwave)

– तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे.
– शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा.
– घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
– तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
– प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
– उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
– घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
– पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
– अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.

अवश्य वाचा- LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर

कामगारांसाठी व कामाच्या ठिकाणच्या सूचना (Heatwave)

– उन्हात काम करीत असल्यास कामगारांनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा.
– कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
– पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा आणि बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या-थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी.
– सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
– गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करू नये ? (Heatwave)

– दुपारी १२.०० ते ०३.०० वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
– उन्हात अतिकष्टाचे कामे करू नका.
– बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
– गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
–  दारु, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
– उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
– उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचे टाळावे व मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

हे पहा – Facebook वर 1 क्लिक करणं महागात; पुणेकर काकांचे सव्वा कोटी एकदम गायब

पशू-प्राण्यांची काळजी आणि आपत्कालीन संपर्क (Heatwave)

– गुरांना आणि पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवावे आणि त्यांना वेळेवर व पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
– लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
– उष्माघाताची लक्षणे दिसताच सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
– मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी
१०७७, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here