नगर : महापालिका निवडणुकीत ‘कैसा हराया’ असं म्हणणाऱ्या मुंब्रामधील एमआएमची (MIM) नगरसेविका सहर शेख (Sahar Shaikh) या बोगस जात प्रमाणपत्राच्या (Bogus Caste Certificate) प्रकरणावरून पुन्हा चर्चेत आली होती. सहर शेख सोबत त्यांचे वडील युनूस शेख (Father Yunus Shaikh) यांच्याही अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले होते. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर यांचे वडील युनूस शेख अखेर नेटवर्कमध्ये आले असून मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ‘करारा जवाब मिलेगा’ असा इशारा विरोधकांना दिला आहे.
नक्की वाचा: दुसऱ्या लग्नाच्या मोहात हातात पडली बेडी; पहिले लग्न लपवणाऱ्या अभियंत्याचा बनाव उघड
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सहर सध्या चर्चेत असतानाच,तिचे वडील युनूस शेख आज अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा करत विरोधकांना थेट इशारा दिला आहे.
अवश्य वाचा: अक्षय तृतीयेला सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार? आजचे दर किती?
‘करारा जवाब’ मिलेगा’ (Sahar Shaikh)
आमच्यावर करण्यात येत असलेले सर्व आरोप धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत. दोन दिवसांत आम्ही आमची भूमिका कायदेशीररीत्या स्पष्ट करू आणि विरोधकांना ‘करारा जवाब’ मिलेगा’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुलगी मोठी होत आहे म्हणून अनेकांना त्रास होत आहे. म्हणून हा केवळ राजकीय स्टंट असल्याचं शेख म्हणाले आहेत.
मॅच पाहायला जाण्यात चुकीचे काय? (Sahar Shaikh)
सहर शेख या ‘नॉट रिचेबल’ असताना नुकत्याच वानखेडे स्टेडियमवर दिसून आली. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात १६ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी सहर वानखेडे मैदानात उपस्थित होत्या. त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. यावरून टीकेची झोड उठली असून यावरही युनूस शेख यांनी भाष्य केलंय. तिने मॅच पाहायला जाण्यात चुकीचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आता युनूस शेख दोन दिवसात नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



