Sujata Padole : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) नूतन नगरसेविका (Corporator) सुजाता गोरख पडोळे (Sujata Padole) यांचा त्यांच्या माहेरच्या पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे नागरी सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लेकीच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी अभिमानाने हा सोहळा साजरा केला.
नक्की वाचा : राहुरीच्या पोटनिवडणूकीसाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा : जिल्हाधिकारी
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
स्वर्गीय दादाभाऊ तुपे व ताराबाई तुपे यांची कन्या असलेल्या सुजाता पडोळे यांच्या निवडीबद्दल गावकऱ्यांनी जल्लोष करत त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला आमदार मोनिकाताई राजळे, मोनाली ताई राजळे (सरपंच), भाऊ पाटील राजळे (पोलीस पाटील) यांच्यासह तुषार तुपे, दत्तात्रय तुपे, राजू तुपे, सदाशिव तुपे, अंबादास काळे, अक्षय तुपे, अतुल म्हस्के, शंतनु राजळे, विक्रम राजळे, विठ्ठल राजळे, शरद तुपे, संगीता धाडगे, गंगूबाई म्हस्के, सुनीता गोरे, शोभा जाधव, साविता कानडे, नयन बनकर, अँकर डॉ. निकिता धाडगे, मंदाकिनी तुपे, पद्मा म्हस्के, भीमाबाई कानडे, रखमाबाई सुसे, राजूभाऊ धाडगे, गणेश जाधव, किरण कानडे, सुभाष धाडगे, दीपक गोरे, रमाकांत पाडळे, पोपट निमसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, (Sujata Padole)
“आई-वडिलांच्या पुण्याईने व त्यांनी दिलेल्या संस्कारातून व्यक्तिमत्त्व घडत असते. सुजाता पडोळे यांनी पिंपळगावचे नाव अभिमानाने उंचावले आहे. नगरसेविका म्हणून जनतेने त्यांना दिलेली जबाबदारी ही मोठी आहे. या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून विकासकामांना गती द्यावी. त्यांच्या कार्यातून त्या निश्चितच आपला ठसा उमटवतील, असा मला विश्वास आहे. माहेरकडून होणारा सत्कार हा प्रत्येकासाठी भावनिक व अभिमानाचा क्षण असतो आणि तो पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरतो,” असे त्या म्हणाल्या.
सत्काराला उत्तर देताना नगरसेविका सुजाता पडोळे म्हणाल्या की, माहेरच्या या सन्मानाने मन भारावून गेले आहे. आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या जोरावर समाजामध्ये चांगले काम उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. हा सत्कार मला पुढील कार्यासाठी प्रेरणा व ऊर्जा देणारा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
या नागरी सत्कार सोहळ्यामुळे पिंपळगावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी आपल्या लेकीच्या यशाचा आनंद साजरा करत तिच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



