Chhatrapati Shivaji Maharaj Maharajaswa Samadhan Shibir : पाथर्डी : केंद्र व राज्य सरकारच्या (Central and State Government) सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना आपल्या गावात एकाच छताखाली मिळावा, जनतेची वैयक्तिक व सार्वजनिक प्रलंबित कामे मार्गी लागावी तसेच शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये म्हणुन मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती (Mahayuti) सरकारने महसूल विभागाच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे (Chhatrapati Shivaji Maharaj Maharajaswa Samadhan Shibir) आयोजित केली जात आहेत.
नक्की वाचा : शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कायम तुमच्यासोबत : मोनिका राजळे

सुमारे साडे तीन ते चार हजार पात्र लाभार्थ्यांना लाभ
पाथर्डी तालुक्यातील नऊ पैकी पाच मंडळात सुमारे साडे तीन ते चार हजार पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळालाआहे. त्यामुळे या पुढील काळात जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. तालुक्यातील माणिकदौंडी महसूल मंडळातील गावासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर माणिकदौंडी येथे आयोजित केले होते. त्या शिबिराचे उद्घाटन आमदार राजळे यांच्या हस्ते झाले त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आमदार राजळे म्हणल्या की (Chhatrapati Shivaji Maharaj Maharajaswa Samadhan Shibir)
पुढे बोलताना आमदार राजळे म्हणल्या की, नागरिकांना आधारकार्ड दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका काढणे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, सातबार दुरुस्ती, जमीन मोजणी, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पीएम किसान, नमो शेतकरी या योजनाच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात कधी अधिकारी भेटत नाहीत तर कधी तांत्रिक अडचण असते. त्यामुळे वेळ व पैसा खर्च होतो. अनेकदा हेलपाटे मारूनही कामे होत नाहीत. त्यामुळे शासकीय अधिकारी आपल्या गावात येऊन आपली सर्व पात्र व प्रलंबित कामे मार्गी लावतात म्हणून या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच महायुती सरकारने महिलासाठी गरोदर माता योजना सुरू केली असून गरोदर मातेच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये जमा होतात व बेबी किट दिली जाते.
योजनेचा लाभ घ्यावा
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना सुरू केली असून त्यासाठी दोन हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. एक किलोमीटर रस्ता कामासाठी पंधरा लाख रुपये निधी मंजुर केला जातो. शेतकऱ्यांनी पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून या योजनेचा लाभ घ्यावा. पात्र लाभार्थ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे अवाहनही आमदार राजळे यांनी केले. तहसीलदार उद्धव नाईक यांनी प्रास्ताविक, वसंत वाघमारे यांनी सूत्रसंचालन तर, नायब तहसीलदार रविंद्र शेकटकर यांनी आभार मानले.
परिसरातील ग्रामस्थ उपस्थित
तहसीलदार उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, नायब तहसीलदार किशोर सानप, दिग्विजय पाटील, रवींद्र शेकटकर, आजिनाथ महाराज आंधळे, सुनील ओव्हळ, अंकुश चितळे, नारायण पालवे, राधाकिसन कर्डीले, संपत गायकवाड, मारुती चितळे, आजिनाथ आव्हाड, शिवनाथ मोरे, अशोक गाडे, राजेंद्र बोरसे, राजू मोरे, महसूल मंडळातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



