Chhagan Bhujbal : नगर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) आगमनावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या (Mahatma Phule Samata Parishad) वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी भरत गारुडकर यांनी समता परिषदेच्या विविध उपक्रमांबाबत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली.
नक्की वाचा : भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार : छगन भुजबळ
सकारात्मक कार्यांना नेहमीच पाठिंबा
या भेटीत बोलताना छगन भुजबळ यांनी समता परिषद ही समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी लढणारी एक प्रभावी संघटना असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, “महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज आहे. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर समाज उभा राहू शकतो. समता परिषदेच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. कार्यकर्त्यांनी संघटित राहून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. शासनही अशा सकारात्मक कार्यांना नेहमीच पाठिंबा देईल.” त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण व शहरी भागातील तफावत कमी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हीच खरी प्रगती आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राजकारण सत्तेसाठी नसून समाज परिवर्तनासाठी असले पाहिजे (Chhagan Bhujbal)
भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाज परिवर्तनासाठी असले पाहिजे. समता परिषदेचे कार्य हे समाजातील विषमता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भरत गारुडकर यांच्यासारखे कार्यकर्ते सातत्याने लोकांसाठी झटत आहेत, हे प्रेरणादायी आहे. त्यांच्या कामाची दखल राज्य पातळीवर घेतली जात आहे आणि भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश
यावेळी भरत गारुडकर यांनी सांगितले की, “समता परिषद ही केवळ संघटना नसून एक सामाजिक चळवळ आहे. आम्ही नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. विविध आंदोलनांद्वारे आम्ही शासनाचे लक्ष वेधले असून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. पुढील काळातही समाजहिताच्या प्रश्नांवर आम्ही अधिक ताकदीने काम करू. छगन भुजबळ यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन मिळत असल्याने आमच्या कार्याला नवी दिशा मिळत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, समता परिषदेच्या माध्यमातून युवकांना संघटित करून सामाजिक बदल घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, माजी महापौर भगवानराव फुलसुंदर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष ब्रिजेश ताठे, कार्याध्यक्ष अभिषेक चिपाडे ,प्रकाश इवळे ,डॉ नागेश गवळी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



