Kotwali Police Station : एसटी प्रवासात सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, कोतवाली पोलिसांची कामगिरी

Kotwali Police Station : एसटी प्रवासात सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, कोतवाली पोलिसांची कामगिरी

0

Kotwali Police Station : नगर : पुणे- नगर एसटी बसमधील (Pune–Nagar ST Bus) प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने चोरी (Theft of Gold Jewelry) करणाऱ्या महिलेला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) अटक करून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

नक्की वाचा : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

तांत्रिक विश्लेषणासह सखोल तपास

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह सखोल तपास सुरू केला. त्यात माया कल्याण भोसले (वय ३६, रा. हातगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीचे सोने तिने ओळखीच्या सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Kotwali Police Station)

याबाबत फिर्यादी मिनाबाई ज्ञानदेव बडाख (वय ५७, रा. करजगाव (सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी ७ एप्रिल २०२६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सकाळी सुमारे १०.३० वाजता वाकडेवाडी एसटी स्थानकातून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या जवळील बॅगेत २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते.
बस घोडनदी (शिरूर) येथे पोहोचल्यावर चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेल्या दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक महिला फिर्यादी यांच्या शेजारी येऊन बसली. पुढे सुपा परिसरात त्या दोन्ही महिला बसमधून उतरल्या. त्यानंतर केडगाव येथे बस पोहोचल्यावर मिनाबाई बडाख यांनी बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह सखोल तपास सुरू केला. त्यात माया कल्याण भोसले (वय ३६, रा. हातगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हिला ताब्यात घेण्यात आले.