Sangamner Crime : कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड; अंनिसच्या तक्रारीवरून अटक

Sangamner Crime : कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड; अंनिसच्या तक्रारीवरून अटक

0
Sangamner Police : कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे अखेर गजाआड; अंनिसच्या तक्रारीवरून अटक
Sangamner Police : कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे अखेर गजाआड; अंनिसच्या तक्रारीवरून अटक

Sangamner Crime : नगर : मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र गडगे याला संगमनेर पोलिसांनी (Sangamner Police) गजाआड केले आहे. संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडगाव पान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवून फसवणूक करणाऱ्या या बाबाविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर (Complaint) ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राजेंद्र गडगे याने वडगाव पान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावत होते.

हेही वाचा : अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन  

अंनिसच्या पुढाकाराने गुन्हा दाखल

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत मुख्य आरोपी राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.

नक्की पहा : भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार – छगन भुजबळ

या कलमांखाली कारवाई (Sangamner Crime)

आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, आयटी (IT) ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.