
Devendra Fadnavis : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीव राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गृह विभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. नाशिकचे बहुचर्चित अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case), आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण,(Conversion Case) परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांच्या तपासाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाला या प्रकरणी महत्त्वाचे आदेश (Important Orders) दिल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा: ‘करारा जवाब मिलेगा’ म्हणत सहर शेखच्या वडिलांचा विरोधकांना इशारा
‘अशोक खरात प्रकरणी भक्कम पुरावे गोळा करा’ (Devendra Fadnvis)
अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर दिला. पीडितांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हा महत्वाचा घटक असला पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
‘नाशिक धर्मांतर पॅटर्नचा खोलवर तपास करा‘

नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाची देखील मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. धर्मांतरासारखे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले, त्यांचे अभिनंदन. पण, आता तितकाच दमदार तपास झाला पाहिजे. यात प्रकरणात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा. कोणताही ॲंगल तपासातून सुटू नये, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
अवश्य वाचा: दुसऱ्या लग्नाच्या मोहात हातात पडली बेडी; पहिले लग्न लपवणाऱ्या अभियंत्याचा बनाव उघड
‘तरुणाई वाचवण्यासाठी मोठ्या कारवाया करा’ (Devendra Fadnvis)
मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडित ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणे एकदम गांभीर्याने घ्या, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. परतवाडा प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास दिला पाहिजे. यासाठी संबधित समाजसेवकांची मदत घ्यावी,अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.


