Suicide : पाथर्डी : युवकाकडून लग्नासाठी दबाव आणल्यामुळे पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची (Suicide) हृदयद्रावक घटना घडली असून, या प्रकरणी एका युवकाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : समता आणि सामाजिक न्यायासाठी संघटित प्रयत्नांची गरज : छगन भुजबळ
फिर्यादीत म्हटले आहे की
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही शेवगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कुटुंबीय शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असून, ती शिक्षणासोबत घरच्या जबाबदाऱ्याही सांभाळत होती. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील एका युवकाने या तरुणीला वारंवार फोन करून तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
युवकाशी काही मिनिटे संवाद (Suicide)
या युवकाने संबंधित विद्यार्थिनीचे इतर ठिकाणी ठरलेले लग्न मोडावे यासाठी तिच्या नातेवाईकांनाही फोन करून माझे तिच्यावर प्रेम आहे तिचे लग्न लावू नका असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १४ एप्रिल रात्रीच्या सुमारास संबंधित युवकाचा फोन आला होता. त्यानंतर १६ एप्रिल सकाळी व पुन्हा सायंकाळी त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनीने त्या युवकाशी काही मिनिटे संवाद साधल्याचे समोर आले आहे.
गुन्हा दाखल
या संभाषणानंतर अल्पावधीतच तिने घरातच विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तिला तातडीने शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र, उपचारादरम्यान १७ एप्रिलला पहाटे तरुणीचा मृत्यू झाला.या प्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.



