Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत साडी

0
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत साडी
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत साडी

नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) ८७ हजार अंत्योदय रेशनकार्डधारकांना (Antyodaya Ration Card Holders) राज्य शासनाच्या साडी वाटप योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात ही मोफत साडी (Free Saree) मिळणार आहे. जिल्हा रेशन पुरवठा विभागाने साड्यांची मागणी नोंदवली असून एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला दुकानांमार्फत या साड्यांचं वितरण होईल. लग्नसराईच्या काळात या लाभामुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

नक्की वाचा: कर्जतमध्ये शिलाई मशिन घोटाळा; ४३९ महिलांची लाखोंची फसवणूक

साडी वाटप योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याचा पुरवठा विभाग आता जोमाने कामाला लागला आहे. शासनाच्या निर्णयानुसार, पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या साड्यांची मागणी नोंदवली आहे. साड्यांचा साठा उपलब्ध होताच, त्याचे वितरण रेशन दुकानामार्फत पारदर्शक पद्धतीने केले जाणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात एकदा साडी वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा शासनाने ही योजना राबविण्याचे निश्चित केल्याने गरीब कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अवश्य वाचा: मंत्रालयात आता कार्यकर्त्यांची गर्दी चालणार नाही; नवे नियम कोणते? 

गरीब कुटुंबांना नवीन वस्त्र उपलब्ध करून देण्याचा योजनेचा उद्देश (Ahilyanagar News)

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अत्यंत गरीब असलेल्या अंत्योदय कुटुंबांना सणासुदीच्या दिवशी किंवा विशेष प्रसंगी नवीन वस्त्र उपलब्ध करून देणे हा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकृत ८७ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक या सवलतीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना यासंबंधीच्या सूचना लवकरच दिल्या जातील.

एप्रिल-मे महिन्यांत होणार वितरण (Ahilyanagar News)

एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात या साड्यांचं प्रत्यक्ष वाटप सुरू होईल. उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईच्या काळात हा लाभ मिळत असल्याने लाभार्थी कुटुंबांना मोठा आधार मिळेल.तसेच या काळात गरिबांचा नवीन वस्त्र खरेदीचा खर्च सुद्धा यामुळे वाचणार आहे. गरीब कुटुंबांना नवीन कपडे मिळावेत, हा यामागचा हेतू आहे. पुरवठा विभागाने थेट रेशन दुकानामार्फत वितरण करण्याचे ठरवल्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार आहे.