Local Crime Branch : गावठी कट्टा बाळगणारे दोघे संशयित जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

५ लाख ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
Local Crime Branch : गावठी कट्टा बाळगणारे दोघे संशयित जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : गावठी कट्टा बाळगणारे दोघे संशयित जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) उंबरे (ता. राहुरी) परिसरात कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात (Suspect Detained) घेतले असून त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, काडतुसे आणि कारसह एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल वसंत पालवे (वय २८, रा. झापवाडी रोड, घोडेगाव, ता. नेवासा), सोमनाथ भानुदास मोरे (वय ३२, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल (Case Registered) झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : अक्षय कर्डिले यांना मत म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांना वाहिलेली श्रद्धांजली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गावठी कट्ट्यांवर कारवाई सुरू असून, त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात स्थानिक पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, अरुण मोरे आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचा समावेश होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

माहितीच्या आधारे पथकाने घेतला शोध (Local Crime Branch)

सोमवारी (ता. २०)  राहुरी तालुक्यात गस्त घालत असताना पथकाला माहिती मिळाली की, विशाल पालवे व सोमनाथ मोरे (दोन्ही रा. नेवासा) हे गोटुंबे आखाडा ते शनिशिंगणापूर मार्गावर पांढऱ्या रंगाच्या कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने शोध घेतला असता उंबरे येथील हॉटेल माऊली परिसरात संबंधित वाहन उभे असल्याचे आढळले.वाहनाची तपासणी केली असता त्यात दोन संशयित आढळले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे विशाल वसंत पालवे (वय २८, रा. झापवाडी रोड, घोडेगाव, ता. नेवासा) आणि सोमनाथ भानुदास मोरे (वय ३२, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) अशी सांगितली.

५ लाख ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस, एक मिसफायर काडतूस, २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ५ लाख ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भगवान बाळासाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.