Free health camp : संगमनेर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या (Construction Workers Welfare Board) वतीने संगमनेर येथील मातोश्री लॉन्स येथे बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे (Free health camp) आयोजन करण्यात आले होते. कष्टाने इमारती उभ्या करणाऱ्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी हे शिबिर एक मोठा आधार ठरले. या शिबिराचे उद्घाटन आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या हस्ते करण्यात आले.
नक्की वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे संशयित जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बांधकाम क्षेत्रात काम करताना धूळ, ऊन, पावसाचा सामना आणि शारीरिक कष्ट यामुळे कामगारांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. हे गांभीर्य लक्षात घेऊन, ‘गावोगावी पोहोचून शेवटच्या कामगाराला वैद्यकीय सुविधा मिळवून देणे’ या ध्येयाने दिवसभर चाललेल्या या शिबिरात कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष बांधकाम कामगारांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात एकूण १५० लाभार्थी कामगारांची रक्त तपासणी करण्यात आली, तर ७० ते ८० गरजूंना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोग्य विभागाची तज्ज्ञ टीम उपस्थित (Free health camp)
यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह, विशेषत: लिव्हर (यकृत) तपासणी आणि इतर अवश्यक वैद्यकीय चाचण्यांचा समावेश होता. यावेळी आरोग्य विभागाची तज्ज्ञ टीम उपस्थित होती. जिल्हा समन्वय अधिकारी (बांधकाम कामगार, विभाग) सविता आढाव, डॉ. तेजल गाडेकर आणि त्यांच्या मेडिकल टीमने अत्यंत तत्परतेने कामगारांची तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
बांधकाम कामगार हा समाजाचा कणा
यावेळी बोलताना जिल्हा समन्वय अधिकारी सविता आढाव यांनी ‘स्क्रीनिंग ते उपचार’ या आरोग्यविषयक संकल्पनेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “आमची ही संकल्पना रोगाचे लवकर निदान करण्यापासून ते उपचारापर्यंत पोहोचण्याची आहे. यामध्ये एकूण ३२ प्रकारच्या विविध तपासण्या केल्या जातात. यामागील मुख्य उद्देश सर्व बांधकाम कामगार निरोगी राहतील, हे सुनिश्चित करणे हा आहे.”बांधकाम कामगार हा समाजाचा कणा आहे, मात्र आरोग्याबाबत अनेकदा ते दुर्लक्षित राहतात. अशा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक करण्यात यश आले आहे. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.



