नगर : महाराष्ट्राची ‘लालपरी’ (ST Bus) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला आता नव्या चेहऱ्यांची साथ मिळणार आहे. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महामंडळ वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. त्यातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया रितेश देशमुख (Genelia Deshmukh) यांची एसटीचे ब्रँड अँबेसेडर (ST Bus Brand Ambassador) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा: आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे
पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून करार (ST Bus Brand Ambassador)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा आज २२ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयात पार पडला. हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अवश्य वाचा: चोरट्याचा गेम ओव्हर! चोरी करायला आलेल्या चोरट्याला महिलेनेचं पकडले
रितेश देशमुख-जेनेलिया ST महामंडळाचे ब्रँड अँबेसेडर (ST Bus Brand Ambassador)
एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच परिवहन खात्याच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना ‘ची जनजागृती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याआधी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या माध्यमातून एसटीला एक वेगळी ओळख मिळाली होती. सन २०२३ मध्ये मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता रितेश आणि जिनिलियाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत एसटी महामंडळ नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.



