Primary School Teacher Dies Due to Heat : वाढत्या उष्णतेमुळे गारगुंडीच्या प्राथमिक शिक्षिकेचे हृदयविकाराने निधन

Primary School Teacher Dies Due to Heat : वाढत्या उष्णतेमुळे गारगुंडीच्या प्राथमिक शिक्षिकेचे हृदयविकाराने निधन

0
Primary School Teacher Dies Due to Heat : वाढत्या उष्णतेमुळे गारगुंडीच्या प्राथमिक शिक्षिकेचे हृदयविकाराने निधन
Primary School Teacher Dies Due to Heat : वाढत्या उष्णतेमुळे गारगुंडीच्या प्राथमिक शिक्षिकेचे हृदयविकाराने निधन

ढवळपुरी पाठोपाठ गारगुंडीतही उष्माघाताचा दगावल्याची शक्यता

Primary School Teacher Dies Due to Heat : पारनेर : दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमानाचा (Temperature) फटका हा ज्येष्ठांसह महिलांना बसत चालला असून पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील प्राथमिक शिक्षिकेला उष्माघातामुळे हृदय विकाराचा धक्का बसल्याने गुरुवारी दुपारी उपचारा दरम्यान मृत्यू (Primary School Teacher Dies Due to Heat) झाला आहे.

नक्की वाचा: टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

उष्णतेमुळे आणखी एक बळी गेल्याची दुर्दैवी घटना

पारनेर तालुक्यातील वाढत्या उष्णतेमुळे ढवळपुरी पाठोपाठ आणखी एक बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिंपळगाव रोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षिका तथा गारगुंडी येथील रहिवासी उषा पोपट फापाळे (कुलट) (वय ५०) यांचे उष्माघातामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले असल्याचे टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डाॅ.ऋत्विज म्हस्के खिलारी यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रकृती झपाट्याने खालावल्याने मृत्यू (Primary School Teacher Dies Due to Heat)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,मयत फापाळे या दैंनंदिन प्रमाणे गुरुवारी सकाळी गारगुंडी येथून या प्राथमिक शिक्षिका दुचाकीवरून पिंपळगाव रोठा येथे शाळेत गेल्या होत्या. सध्या शाळा सकाळच्या सत्रात भरत असल्याने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर त्या प्रखर उन्हातच परतीच्या प्रवासाला निघाल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले तसेच अंगात अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने कान्हूर पठार येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या अगोदर ढवळपुरी येथील माळवडी मधील ४५ वर्षीय महीलेचा शेतात काम करताना मृत्यु झाला आहे.दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.दिवसेंदिवस वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, अशी सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

सध्या तालुक्यातील तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे दुपारी ११ ते सायंकाळी ४ या कालावधीत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास डोक्यावर टोपी, अंगावर हलकी सुती वस्त्रे वापरावीत आणि भरपूर पाणी पिण्यावर भर द्यावा
डॉ प्रकाश कांबळे,तालुका आरोग्य अधिकारी