Women Thrash Illegal Liquor Sellers : अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला चोप; अकोले तालुक्यातील घोटी-शिळवंडी येथील घटना

Women Thrash Illegal Liquor Sellers : अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला चोप; अकोले तालुक्यातील घोटी-शिळवंडी येथील घटना

0

Women Thrash Illegal Liquor Sellers : अकोले : तालुक्याच्या आदिवासी भागातील घोटी-शिळवंडी येथील संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांना बुधवारी (ता.२२) चोप दिला. (Women Thrash Illegal Liquor Sellers) तसेच त्यांना पकडून पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. यावेळी महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.

नक्की वाचा: टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

याबाबत राजूर पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की,

बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घोटी-शिळवंडी शिवारातील शिळवंडी फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना ग्रामस्थ व महिलांनी पकडले असल्याची माहिती पोलीस ठाण्यात समजली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी पथकाला घटनास्थळी पाठवले. पोलीस हवालदार विनायक कोकणे व सचिन शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अशोक भाऊसाहेब चौधरी (वय २९, रा. आंभोळ) याला संतप्त महिला व ग्रामस्थांनी पकडून ठेवले होते. दुसरा संशयित आरोपी कुंडलिक किसन गंभिरे (वय ५०, रा. सोमलवाडी) पळून गेला होता. हे दोघेही अवैध दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे महिला व ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. यावेळी देशी दारूच्या बाटल्या आढळल्या.

Women Thrash Illegal Liquor Sellers : अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला चोप; अकोले तालुक्यातील घोटी-शिळवंडी येथील घटना
Women Thrash Illegal Liquor Sellers : अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला चोप; अकोले तालुक्यातील घोटी-शिळवंडी येथील घटना

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महिलांनी केली कडक कारवाईची मागणी (Women Thrash Illegal Liquor Sellers)

पोलिसांनी पंचांसमक्ष घडलेल्या घटनेची माहिती घेत पंचनामा केला व मुद्देमालासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस हवालदार विनायक कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, अवैध दारू विक्रीमुळे आमचे प्रपंच उद्ध्वस्त होत असल्यामुळे याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी या गावातील संतप्त महिलांनी केली आहे