Election : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान

Election : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान

0
Election : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान
Election : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान

Election : नगर : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले. या निवडणुकीसाठी राज्यभरातून एकूण ६० उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी ९ सदस्य निवडले जाणार आहेत. मतदार म्हणून परिषदेकडे नोंदणीकृत आधुनिक वैद्यकीय व्यवसायिकांचा समावेश आहे.

हेही वाचा :  भोंदू गडगे बाबाच्या अडचणीत वाढ; २७ एप्रिलपर्यंत ठोठावली पोलीस कोठडी  

निवडणूक प्रक्रिया

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून एकूण मतदार संख्या २ हजार ९१६ इतकी आहे. मतदारांच्या ओळख पटविण्यासाठी परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र, छायाचित्र नसल्यास अन्य फोटो ओळखपत्र, परिषदेकडून दिलेले ओळखपत्र व भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली छायाचित्र असलेली सर्व ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. ओळखीचा पुराव्यांची मूळ प्रत आवश्यक आहे. छायाकिंत व मोबाईलमधील प्रत ग्राह्य धरली जाणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल नेता येणार नाही.

नक्की पहा : मी राष्ट्रवादीतच…भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्राजक्त तनपुरे यांचे स्पष्टीकरण

प्रशासकीय तयारी पूर्ण (Election)

अहिल्यानगर शहरातील डॉ. ना. ज. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ४ मतदान केंद्रे व डॉ. ना. ज. पाटील फार्मसी कॉलेज, वसंत टेकडी, सावेडी येथे १ असे एकूण ५ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १ क्षेत्रीय अधिकारी, वर्ग २ दर्जाचे ६ मतदान केंद्राध्यक्ष व वर्ग ३ संवर्गातील २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत पात्र मतदारांनी निर्धारित वेळेत मतदान करून आपला हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.