Mob Attack : नगर : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर त्याचे पूर्ण बिल मागितल्याचा राग मनात धरून, टोळक्याने हॉटेल मालकावर लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि विटांनी हल्ला (Mob Attack) केल्याची घटना निंबळक बायपास (Nimbalak Bypass Road) परिसरात घडली आहे. या हल्ल्यात अमोल अशोक बनकर (वय ४०, रा. जाधव पेट्रोल पंपासमोर, शिवाजीनगर, कल्याण रस्ता) हे जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा: वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर गुन्हे दाखल
जेवण चांगले नसल्याचे कारण देत पैसे देण्यास नकार
त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गणेश बोरूडे, भूषण बोरूडे (दोघे रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रस्ता), अमोल वंजारे (रा. नवनागापूर, एमआयडीसी) यांच्यासह त्यांच्या १० ते १५ साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमोल बनकर यांचे निंबळक बायपास रस्त्यावर हॉटेल आहे. २२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गणेश बोरूडे हा त्याच्या काही साथीदारांसह जेवणासाठी आला होता. जेवणानंतर दोन हजार १०० रूपये बिल झाले असताना, गणेश याने केवळ एक हजार रूपये देऊन जेवण चांगले नसल्याचे कारण देत उर्वरित पैसे देण्यास नकार दिला. बनकर यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ करत आपल्या भावाला आणि मित्रांना बोलावून घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलिसांनी केला गुन्हा नोंद (Mob Attack)
मध्यरात्रीच्या सुमारास भूषण बोरूडे, अमोल वंजारे आणि इतर साथीदार तेथे पोहोचले. आम्ही कोण आहोत हे तुला माहित नाही का? असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि विटांनी बनकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बनकर जखमी होऊन खाली पडल्यानंतर सर्व संशयित आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अंमलदार योगेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.



