Local Crime Branch : पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वैधरित्या गॅस साठवणूक करून वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई

0
Local Crime Branch : पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. सचिन अशोक भांड (वय ३६, रा. शिमला कॉलनी, भिस्तबाग रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) याला गॅस रिफिलिंग (Gas refilling) करताना आढळून आला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : लहान मुले घडविण्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मोलाचे योगदान : खताळ

माहितीच्या आधारे टाकला छापा

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैधरित्या गॅस साठवणूक करून वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सुनिल पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करून शहरात तपास आणि गस्त वाढविण्यात आली होती. मंगळवारी (ता.२८) गस्तीदरम्यान पथकाला पाईपलाईन रोडवरील एका वॉशिंग सेंटरजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस टाकीतून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला असता, सचिन अशोक भांड (वय ३६, रा. शिमला कॉलनी, भिस्तबाग रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) हा इसम प्रत्यक्षात गॅस रिफिलिंग करताना आढळून आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये दहा हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार, गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे पाईप व नोझल, सहा हजार रुपये किमतीचा अर्धवट भरलेला घरगुती गॅस सिलिंडर आणि ५०० रुपयांचा वजनकाटा यांचा समावेश आहे.संशयिताने कोणताही शासकीय परवाना न घेता घरगुती गॅसचा वापर करून वाहनांमध्ये रिफिलिंग करत होता. तसेच ज्वलनशील पदार्थ हाताळताना आवश्यक ती सुरक्षा न बाळगता स्वतःच्या व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.