Gau Samman Abhiyan : पाथर्डीत देशव्यापी ‘गौ सन्मान’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गौ सन्मान’ अभियानात पाथर्डीकरांनी दिलेला प्रतिसाद ठरला लक्षणीय

0
Gau Samman Abhiyan : पाथर्डीत देशव्यापी ‘गौ सन्मान’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Gau Samman Abhiyan : पाथर्डीत देशव्यापी ‘गौ सन्मान’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gau Samman Abhiyan : पाथर्डी : देशभरात राबविण्यात येत असलेल्या गौ सन्मान आवाहन अभियान (Gau Samman Abhiyan) अंतर्गत पाथर्डीत स्वाक्षरी व निवेदन मोहीम उत्साहात झाली. गाईला देशात योग्य सन्मान मिळावा, तिचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा या अभियानामागील मुख्य हेतू असून, त्यासाठी शासनाचे (Government) लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अभियानाला पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

नक्की वाचा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मान

नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग

विविध भागांतून स्वाक्षऱ्या संकलित करून त्या तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी प्रसाद मते व तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांना निवेदनाच्या स्वरूपात सादर करण्यात आल्या. माँ पुकार रही है… क्या आप अपनी जिम्मेदारी निभाने के लिए तैयार हैं? या घोषवाक्यामुळे अभियानाला विशेष प्रतिसाद मिळाला. गोसेवा संघ पाथर्डी व गोरक्षक समिती पाथर्डी यांच्या वतीने हा उपक्रम तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात आला. अभियानातून गोमातेच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना, गोशाळांना मदत आणि जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गाईच्या सन्मानासाठी आपली भूमिका स्पष्ट केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाथर्डीकरांनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय (Gau Samman Abhiyan)

देशव्यापी गौ सन्मान’ अभियानात पाथर्डीकरांनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय ठरला असून, या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत असून तालुक्यातील सुमारे बारा लोकांनी स्वाक्षऱ्या यासाठी दिल्या आहेत असे मुकुंद गर्जे म्हणाले. या अभियानाच्या स्वाक्षरी फाईल देता वेळी दिपक काळे महाराज, मुकुंद गर्जे, नगरसेवक प्रतिक नांगरे, बाळासाहेब गीते, आशुतोष शर्मा, सोमनाथ बंग, अ‍ॅड. नामदेव जयभाय, नानासाहेब पालवे, चिकू खेडकर, प्रथमेश नाकील, गणेश जवरे, विशाल शिंदे, समर्थ रोडी, किशन फतपुरे, डॉ.संजीव धनवडे आदी उपस्थित होते.