Jamkhed Crime : अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?  

0
Jamkhed Crime : अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?  
Jamkhed Crime : अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?  

नगर : जामखेड (Jamkhed Crime) तालुक्यातील अरणगावमध्ये एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शेजाऱ्याला शिवीगाळ (Abusing a neighbor) करण्याच्या कारणातून बाप-लेकामध्ये जोरदार वाद होऊन कोयत्याने हाणामारी (Clash involving sickles) झाली. यात मुलाच्या हातून बापाचा मृत्यू झाला. २६ एप्रिलला सायंकाळी ही घटना घडली. रावसाहेब उर्फ बबन विठ्ठल सोनवणे असे मयताचे नाव असून याप्रकरणी मयताचा मुलगा अशोक रावसाहेब सोनवणे याच्यावर जामखेड पोलिस ठाण्यात (jamkhed Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: श्रीरामपुरच्या भोंदूबाबाचा भांडाफोड,महिलेवर अत्याचार अन् २० लाखांची लूट ; प्रकरण काय?

नेमकं घडलं काय? (Jamkhed Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिलला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत रावसाहेब सोनवणे शेजाऱ्यांना शिवीगाळ करत होते. यावेळी त्यांचा मुलगा अशोक याने आपल्या वडिलांना शेजाऱ्यांना शिवीगाळ करू नका,असे सांगितले. मात्र वडिलांनी आपल्या मुलालाच कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलाने वडिलांच्या हातातील कोयता हिसकावून घेतला आणि त्यांना कोयता व त्या ठिकाणी आसलेल्या काठीने पाठीवर व पोटावर मारहाण केली. या मारहाणीत रावसाहेब हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना जामखेड येथील रुग्णालयात दाखल केले. नंतर ग्रामीण रुग्णालय सुद्धा नेले. मात्र तोपर्यंत डॉक्टरांनी रावसाहेब सोनवणे मयत झाले असल्याच त्यांना सांगितले.

अवश्य वाचा: राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेचे वितरण आता एका क्लिकवर

मुलावर खुनाचा गुन्हा दाखल (Jamkhed Crime)

ही घटना घडली त्या दिवशी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पुण्यातील ससून हॉस्पिटलला शवविच्छेदन केल्यानंतर आलेल्या अहवालात पोटात व पाठीवर झालेल्या जखमेमुळे पोटात रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर मंगळवारी पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा अशोक रावसाहेब सोनवणे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.