
Extortion : नगर : सोलर प्रकल्पाचे (Solar Project) काम सुरु ठेवण्यासाठी कंपनीच्या संचालकासह कामगारांना बेदम मारहाण करत २ कोटीची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारात घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) २८ एप्रिल रोजी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नककी वाचा : उपमहापौर धनंजय जाधव चषक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३ मे ला आयोजन
संशयित आरोपींचे नाव
पोपट गजानन कोकाटे, ओंकार पोपट कोकाटे, अंबादास गजानन कोकाटे (सर्व रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. याबाबत सनस्ट्रीम ग्रीन एनर्जी प्रा.लि. या कंपनीचे संचालक करण दिपक भद्रा (वय ३८, रा. घाटकोपर ईस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कंपनीच्या वतीने चिचोंडी पाटील शिवारात सोलर प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
खंडणी देण्यास नकार देताच मारहाण (Extortion)
या ठिकाणी २७ एप्रिल रोजी रात्री पोपट गजानन कोकाटे, ओंकार पोपट कोकाटे, अंबादास गजानन कोकाटे (सर्व रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) हे गेले. त्यांनी सोलर प्रकल्पाच्या अंडर ग्राऊंड केबल लाईनचे नुकसान करत तेथे असलेले कंपनीचे संचालक करण भद्रा यांना सोलर प्रकल्पाचे काम सुरु ठेवण्यासाठी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती देण्यास नकार देताच आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. नंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांचे कामगार तेथे आले असता आरोपींनी त्यांना ही शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


