
Pathardi Police Station : पाथर्डी : पाथर्डी पोलीस ठाण्यातील (Pathardi Police Station) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने लाच (Bribery) घेताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना आज (ता. २९) उघडकीस आली आहे. या कारवाईत एका पोलिसाला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा कर्मचारी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकारामुळे पाथर्डी पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : सोलर कंपनीच्या संचालकाला मागितली २ कोटीची खंडणी; अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सापळा रचून ही कारवाई
प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या अपघातग्रस्त वाहनाची सुटका करून देण्यासाठी संबंधित पोलिसांनी पैशांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एक कर्मचारी घटना स्थळावरून पसार (Pathardi Police Station)
या पोलीस हेडकॉन्स्टेबल व पोलीस कॉन्स्टेबल या कारवाईत दोन पोलीस कर्मचारी सापडले असून एक कर्मचारी घटना स्थळावरून पसार झाला आहे. एकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.


