Police Checking : नगर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू गडगे महाराज याला औषध पुरवठा करणाऱ्या डॉ. मोहन पुरीच्या सिन्नर नायगाव परिसरातील औषध निर्मिती प्लांटची पोलिसांनी तपासणी करून तेथील नमुने ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी दिली. दरम्यान, बेलापूर येथील भोंदू बाबाकडील औषधे व भोंदू गडगेची औषधे सारखीचं असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ही औषधे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
हेही वाचा : पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पुरी हाच मास्टरमाइंड
भोंदू गडगे महाराजविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. भोंद गडगेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील दोघांना अटक करण्यात आली तर, तिघेजण पसार झाले आहेत. यात डॉ. मोहन पुरी याचा समावेश आहे. मोहन पुरी हाच मास्टरमाइंड आहे. तोच सर्वच भोंदूबाबांना विविध प्रकारची औषधे पुरवत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यामुळे पोलिसांनी अधिक तपास करीत सिन्नर येथील नायगाव परिसरात डॉ. मोहनपुरी याच्या औषध निर्मिती प्लांटवर मंगळवारी (दि. २९) पोलिस तपासासाठी गेले.
नक्की पहा : आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत म्हणाले…देवा मला पाव
बेलापूर कनेक्शन (Police Checking)
तेथील औषधे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. हा अहवाल आल्यानंतरचं वस्तुस्थिती उघड होणार आहे. ही औषधे नेमकी कशावरची आहेत, हे उघड होणार आहे. ही सर्वच औषधे बनावट असल्याचे बोलले जात आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील येथील भोंदू गणेश शिंदेबाबाकडील औषधे व संगमनेर येथील भोंदू गडगे याची औषधे सारखीचं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यामुळे या भोंदूलाही डॉ. मोहन पुरीच औषधे पुरवत असल्याचे उघड झाले आहे.



