Exit Poll : राहुरीचा एक्झिट पोल आला समोर; ‘रुद्र रिसर्च’च्या आकडेवारीनुसार कोण विजयी होणार? 

0
Exit Poll : राहुरीचा एक्झिट पोल आला समोर; 'रुद्र रिसर्च'च्या आकडेवारीनुसार कोण विजयी होणार? 
Exit Poll : राहुरीचा एक्झिट पोल आला समोर; 'रुद्र रिसर्च'च्या आकडेवारीनुसार कोण विजयी होणार? 

Exit Poll : नगर :  राहुरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत एकूण 56.20% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या मतदारसंघातील जागा रिक्त होती. राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले यांचा एकतर्फी विजयाची शक्यता आहे असा Exit Poll चा अंदाज ‘रुद्र रिसर्च’ व्यक्त केला आहे. 

हेही वाचा : ‘असा’ करा उष्माघातापासून बचाव; आरोग्य विभागाने दिल्या दक्षतेच्या सूचना

हे उमेदवार रिंगणात

राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

नक्की पहा : विवेक कोल्हेंचं राजकीय पुनर्वसन, राजकारणात पुन्हा दमदार एंट्री

काय आहे अंदाज (Exit Poll)

‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा आपला गड राखणार असल्याचे दिसून येते. अंदाजानुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 142500 (76%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25500 ( 14%) तर इतरांना 19463 (10%) मतदान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 117000 (62%) इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयाची शक्यता असल्याचे दिसून येते. पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली. याचा फायदा कर्डिलेंना होत असल्याचे दिसून येते.