
Shri Vardhaman Sthanakvasi Jain Shravak Sangh : पाथर्डी : येथील जैन समाजातील दीक्षार्थी मधुरा महेश भंडारी (Madhura Mahesh Bhandari) यांच्या स्वागतासाठी पाथर्डी शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या (Shri Vardhaman Sthanakvasi Jain Shravak Sangh) वतीने आयोजित स्वागत सोहळ्यात जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या स्वागत सोहळ्याची सुरुवात सकाळी वामनभाऊ नगर येथून बाईक रॅलीने (Bike Rally) झाली. पारंपारिक फेटे परिधान केलेल्या युवती, युवकांनी जोशात रॅलीत सहभाग घेतला.
नक्की वाचा : आमदार रोहित पवारांकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवास्थानांच्या कामाची पाहणी
महिला व पुरुषांचा जोडीने मोटरसायकल रॅलीत सहभाग
शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली जैन स्थानकापर्यंत पोहोचली. वामनभाऊनगर, शेवगाव रोड, कोरडगाव चौक, नाईक चौक, अजंठा चौक, क्रांती चौक, गांधी चौक मार्गे रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. जैन स्थानक येथे दीक्षार्थी मधुरा भंडारी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी महिला भगिनींच्या लेझीम पथकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. उपस्थितांनी ‘जय जयकार’ करत परिसर दणाणून सोडला. यानंतर जैन साधूंच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम झाला. संपूर्ण शहरातील जैन समाजातील महिला व पुरुषांनी जोडीने मोटरसायकल रॅलीत सहभाग घेत या सोहळ्याला वेगळेच स्वरूप प्राप्त करून दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाथर्डी शहरात धार्मिक व सामाजिक एकतेचे दर्शन (Shri Vardhaman Sthanakvasi Jain Shravak Sangh)
या आगळ्या-वेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे पाथर्डी शहरात धार्मिक व सामाजिक एकतेचे दर्शन घडले असून, दीक्षार्थी मधुरा भंडारी यांच्या पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मुख्य दीक्षा सोहळा ११ में रोजचा मुख्य दिवस असून विविध धार्मिक कार्यक्रम २ में पासून सुरू आहे. राज्यातील व राज्याबाहेरील सर्व जैन बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाथर्डी येथील जैनबांध वांकडून करण्यात आले. या सोहळ्यासाठी दीक्षार्थी मधुरा भंडारी यांच्यासह त्यांचे वडील महेश भंडारी व आई आरती भंडारी उपस्थित होते.


