Akshay kardile : राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत

0
Akshay kardile : राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत
Akshay kardile : राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत

Akshay kardile: देशातील ५ राज्यांच्या विधानसभा आणि महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (Bypoll Results) आज जाहीर होत आहेत. अपेक्षेप्रमाणे बारामती (Baramati) आणि राहुरी (Rahuri) मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मताधिक्याचा विक्रम नोंदवला आहे. तर दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी देखील १ लाखांच्या मताधिक्याचा टप्पा पार केला आहे.

नक्की वाचा: केडगावात साखरपुड्याचा थाट ; १६ तोळे सोन्यावर चोरट्याचा डल्ला

बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान (Akshay kardile)

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना २३ व्या फेरीअखेर तब्बल २ लाख १४ हजार ५८६ मतांची आघाडी होती. मात्र, शेवटच्या फेरी अखेर सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. हे देशातील सर्वाधिक विधानसभा मताधिक्य असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. येथील मतदारसंघाच्या आमदारांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती.

अवश्य वाचा: जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!

भाजपचे अक्षय कर्डीले विजयी (Akshay kardile)

बारामतीमध्ये अजित पवार आणि राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली निधन झाल्यामुळे येथील मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. राहुरीत २६ व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले १,०७, ४८५ मतांनी आघाडीवर होते. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २६,९६१ मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळकेंना ५,५१८ मतं पडली आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना ७,२०७ मतं मिळाली असून लाखांच्या फरकाने अक्षय कर्डिले आमदार बनले आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आणि भाजप नेत्यांनी भेट घेतल्यानंतर तनपुरे यांनी उमेदवारी स्वीकारली नाही. त्यामुळे, राष्ट्रवादीने रासाहेब खेवरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, खेवरे यांना निवडणुकीत जनतेनं नाकारल्याचं दिसून येत आहे. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अंतिम निकालात अक्षय कर्डिले यांना १,४०,०९३ मते पडली आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २७,५०६ मते,  अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना ७,२९९ मते पडली आहेत. अक्षय कर्डीले या निवडणुकीत अक्षय कर्डिले १,१२,५८७ मतांनी विजयी झाले आहेत.