Ahilyanagar | नगर : विचार भारतीतर्फे दर वर्षी ग.म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे १४ वे वर्ष आहे. २४ मे पासून ही व्याख्यानमाला सुरू होणार आहे. या व्याख्यानमालेच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली प्रत आज (ता. ५) अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती चरणी अर्पण करण्यात आली. ही व्याख्यानमाला २४ ते २८ मे या कालावधीत सायंकाळी ६.३० ते ८.३० यावेळेत अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात होईल.
अवश्य वाचा- खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पाच व्याख्याने
२४ मे रोजी देशाला पोखरणारी वाळवी या विषयावर प्रसिद्ध लेखक, वक्ते अभिजित जोग यांचे, २५ मे रोजी २०४७ विकसित भारत : संधी आणि आव्हाने या विषयावर सोलो – इकॉनॉमिक तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय वक्ते दीपक करंजीकर यांचे, २६ मे रोजी बदलती हिंदी सिनेसृष्टी या विषयावर दिग्दर्शक कामाख्या सिंह व निर्माते विपुल शाह यांचे, २७ मे रोजी संघाची शताब्दी व पंचपरिवर्तन या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व कार्यवाह सुरेशराव जोशी यांचे तर २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील शस्त्रसिद्ध भारत या विषयावर लेखक, प्रेरक वक्ते निवृत्त मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे.
नक्की वाचा- जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!
हे आहेत कार्यक्रमांचे प्रायोजक
या व्याख्यानमालेसाठी शांतिकुमारजी मेमोरियल फाउंडेशन, कोहिनूर, पंचगंगा शुगर अॅण्ड पॉवर, बांगडीवाला फाउंडेशन, कामथ असोसिएटस, श्रीगोपाल रामनाथ धुत फाउंडेशन हे प्रायोजक आहेत. रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेकचर अहिल्यानगर, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मार्क कन्स्ट्रक्शन, डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड, देवगिरी बँक, श्री आनंद ट्रेडिंग कंपनी सहप्रायोजक आहेत. आय लव्ह नगर डिजीटल पार्टनर तर रेडिओ सिटी ९१.१ एफएम रेडिओ पार्टनर आहे.



