Mahavitaran Load Shedding : कर्जत : कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा (Electricity Supply) मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी अहिल्यानगरला महावितरणची (Mahavitaran Load Shedding) बैठक मंगळवारी (ता. ५) घेतली. यासह १ मे महाराष्ट्र दिनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याच प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर दोन्ही लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी योग्य तोडगा काढून दिलासा देऊ अशी उत्तरे दिली. विशेष म्हणजे त्याच दिवशी म्हणजे कर्जत शहर तब्बल दोन ते तीन तास अंधारात राहिले.
नक्की वाचा : टाकळीभान उपबाजारात ९ मे पासून मोकळा कांदा मार्केटला प्रारंभ
सर्वसामान्य नागरिक उषणतेने हैराण
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून सर्वसामान्य नागरिक उष्णतेने हैराण होत आहे. नागरिकांसह सर्वसामान्य शेतकरी देखील विजेच्या भारनियमनाने त्रस्त असून अखंडित वीज पुरवठा व्हावा. तसेच ज्या ठिकाणी भारनियमन अधिक होत आहे त्याची वेळ कमी करून शेती आणि पशुपालक यांना सोयीस्कर असणाऱ्या वेळेत योग्य दाबाने वीजपुरवठा करावा अशी मागणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंगळवारी (ता. ९) अहिल्यानगर शासकीय विश्रामगृह येथे स्थानिक पदाधिकारी आणि महावितरणच्या जिल्हा व दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. तत्पूर्वी १ मे महाराष्ट्र दिनी आमदार रोहित पवार यांनी देखील कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांसोबत घेत कर्जत कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत लक्ष वेधले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ज्या दिवशी बैठक त्याच दिवशी कर्जत शहर अंधारात (Mahavitaran Load Shedding)
या दोन्ही लोकप्रतिनिधींना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देऊ असे आश्वासन दिले. मात्र, ज्या दिवशी बैठक झाली आणि निर्णय झाला त्याच दिवशी कर्जत शहरात तब्बल अडीच ते तीन तास वीज गुल झाली. दोन्ही लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या बैठकीचे फोटो आणि झालेला निर्णय व्हायरल केला. त्या दिवशीच कर्जतकर तब्बल अडीच तास अंधारात राहिले ही शोकांतिका म्हणावी लागेल.



