Pune Parvati Crime News : रक्ताचं नातं बनलं वैरी! पुण्यात आजोबाकडून ९ वर्षांच्या नातीवर अत्याचार

0
Pune Parvati Crime News : रक्ताचं नातं बनलं वैरी! पुण्यात आजोबाकडून ९ वर्षांच्या नातीवर अत्याचार
Pune Parvati Crime News : रक्ताचं नातं बनलं वैरी! पुण्यात आजोबाकडून ९ वर्षांच्या नातीवर अत्याचार

नगर: पुणे जिल्ह्यातील नसरापूरची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पर्वती (Parvati Area) परिसरात (Pune Parvati Crime News) माणुसकीला काळीमा फासणारी अजून एक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरड्या नातीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न (Grandfather sexually assaulted his granddaughter) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 05) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत पर्वती पायथा परिसरात ठिय्या आंदोलन केले. आता हे संपूर्ण प्रकरण? काय ते पाहूया…

नक्की वाचा: छातीवर वळ, तोंडात मोजा; नसरापूर पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय?

नेमकं काय घडलं? (Pune Parvati Crime News)

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित होते. त्यामुळे घरामध्ये नऊ वर्षांची मुलगी आणि तिचे आजोबा दोघेच होते. यावेळी या नराधम आजोबाने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केलाय. घरातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला संशय आला. त्या महिलेने प्रसंगावधान राखत घराच्या फटीतून डोकावून पाहिले असता, आजोबांचा घृणास्पद प्रकार सुरू असल्याचे समोर आले. महिलेने तातडीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जमा केले. नागरिकांनी घराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने दार उघडण्यास नकार दिला. कारवाईच्या भीतीने आरोपीने चिमुरडीला घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवले आणि त्यानंतर दार उघडले. पर्वती परिसरात असणाऱ्या दत्तवाडीमध्ये ही घटना घडली आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव अंबादास यल्लाप्पा जाधव असल्याची माहिती आहे. या घटनेत नराधम आरोपीने पोटच्या मुलीच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवशी १० बालविवाह रोखले; प्रकरण काय?

पोलिसांनी आजोबाला ठोकल्या बेड्या (Pune Parvati Crime News)

यावेळी संतप्त नागरिकांनी घरात घुसून आरोपीला पकडले आणि चांगलाच चोप दिला.या प्रकरणी नराधम आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर घटनेबाबत सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पर्वती परिसरात आजोबांनी नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना निंदनीय आहे. पीडित मुलगी सुखरूप असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी हा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवण्याचा आमचा प्रयत्न असेल. असं शर्मा म्हणाले.