Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा

ऑस्ट्रेलियातील साखर उद्योगामध्ये उत्पादकता, गुणवत्ता आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला विशेष प्राधान्य

0
Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा
Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा

Vasantdada Sugar Institute : संगमनेर : महाराष्ट्रातील ऊस शेती आणि साखर उद्योग (Sugar Industry) अधिक आधुनिक, संशोधनाधारित व जागतिक स्पर्धात्मक बनविण्याच्या उद्देशाने पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) (व्हीएसआय) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने ऑस्ट्रेलियातील (Australia) विविध जागतिक दर्जाच्या ऊस संशोधन संस्था, प्रगत प्रयोगशाळा, फिनॉमिक्स केंद्रे, स्पीड ब्रीडिंग सुविधा तसेच आधुनिक साखर कारखान्यांना भेट देत सविस्तर अभ्यास दौरा केला.

नक्की वाचा : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू; १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा
Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा

‘आयरिस’ प्रयोगशाळेला भेट

या शिष्टमंडळामध्ये माजी मंत्री तथा व्हीएसआय नियामक मंडळ सदस्य बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांच्यासह पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशीर कपिल आणि रेणूजीवशास्त्र व जनुकीय अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक जगताप यांचा समावेश होता. दौर्‍यादरम्यान शिष्टमंडळाने ‘शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया’च्या अत्याधुनिक ‘आयरिस’ प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रयोगशाळेमध्ये ऊस जीनोमिक्स, रोग निदान, टिश्यू कल्चर, साइटोजेनेटिक्स, कीड व रोग व्यवस्थापन तसेच मृदा आणि पोषण विश्लेषणासंदर्भातील आधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध असून ऊस उद्योगासाठी वेगवान आणि अचूक संशोधन कार्य येथे केले जाते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

येथे विकसित होणारे संशोधन जागतिक स्तरावर उपयोगी (Vasantdada Sugar Institute)

तसेच ‘द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड’ येथील स्पीड ब्रीडिंग सुविधेची पाहणी करण्यात आली. नियंत्रित तापमान, कृत्रिम प्रकाश व्यवस्था आणि आधुनिक नियंत्रित वातावरण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी कालावधीत नवीन ऊस व इतर पिकांच्या जाती विकसित करण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादनक्षम आणि प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिष्टमंडळाने ‘शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया’ अंतर्गत कार्यरत प्रसिद्ध फोटोपीरियड सुविधा आणि हायड्रोपोनिक्स संशोधन केंद्रालाही भेट दिली. कृत्रिम प्रकाश नियंत्रणाद्वारे ऊसात फुलोरा प्रेरित करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात आला. विविध देशांतील ऊस प्रजनन कार्यक्रमांसाठी मेरिंगा केंद्राला विशेष महत्त्व असून येथे विकसित होणारे संशोधन जागतिक स्तरावर उपयोगी ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

फिनॉमिक्स सुविधेचीही पाहणी

याशिवाय ‘वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी’ अंतर्गत कार्यरत ‘ऑस्ट्रेलियन प्लांट फिनॉमिक्स नेटवर्क’च्या अत्याधुनिक नियंत्रित वातावरण व हाय-थ्रूपुट फिनॉमिक्स सुविधेचीही पाहणी करण्यात आली. ड्रोन, सेन्सर, इमेजिंग प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्सच्या साहाय्याने पिकांची वाढ, दुष्काळ सहनशीलता, पोषण कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता यांचे अचूक विश्लेषण कसे केले जाते याचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. ऑस्ट्रेलियातील आधुनिक साखर कारखान्यांनाही भेट देत ऊस गाळप, ऊर्जा निर्मिती, बॅगॅसचा पुनर्वापर, स्वयंचलित मिल व्यवस्थापन, कार्यक्षम प्रोसेसिंग आणि शाश्वत साखर उत्पादन पद्धतींचा सखोल अभ्यास करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील साखर उद्योगामध्ये उत्पादकता, गुणवत्ता आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.