
Agasti Sahakari Sakhar Karkhana Limited : अकोले : भूलथापांना बळी पडू नका, अगस्ति साखर कारखान्याचा (Agasti Sahakari Sakhar Karkhana Limited) २०२६-२७वा गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर (Sitaram Gaykar) यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू
आगामी हंगामासाठी प्राथमिक तयारीला वेग
कारखान्याच्या आगामी हंगामासाठी प्राथमिक तयारीला वेग आला असून, ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. बुधवारी ऊसतोडणी टोळी मुकादमांना आगाऊ रक्कम देण्यात आली. अगस्ति साखर कारखाना हा तालुक्यातील अर्थकारणाचा कणा मानला जातो. या कारखान्यामुळे हजारो कुटुंबांचे संसार फुलले असून स्थानिक बाजारपेठेला मोठा आधार मिळतो. मात्र, कारखान्याची चिमणी थंडावली तर त्याचे परिणाम गंभीर होणार असल्याचेही गायकर यांनी स्पष्ट केले. साखर कारखाना अडचणीत असून कामगारांना ले-ऑफ देण्यात आला आहे. कारखान्याचे आर्थिक नुकसान कमी व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. दिवाळीपूर्वी राहिलेले दोनशे रूपये प्रतीटन शेतकऱ्यांना देऊन दिलेला शब्द पाळू, असा विश्वास गायकर यांनी दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ऊसतोडणी प्रतिनिधी उपस्थित (Agasti Sahakari Sakhar Karkhana Limited)
यावेळी ज्येष्ठ संचालक पर्बत नाईकवाडी, अशोक देशमुख, विकास शेटे, बाळासाहेब नाईकवाडी, कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस, मुख्य लेखापाल विजय सावंत, गबरू मुकादम आदींसह ऊसतोडणी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.


