नगर : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladaki Bahin Yojana) आनंदाची बातमी आहे. कारण आता लाडक्या बहिणींना ३ महिन्याचे हप्ता एकत्र दिले जाणार (Three months’ installments will be paid together)आहे. एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामळे लाडक्या बहिणींना रखडलेला निधी (Funds) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नक्की वाचा: तलाठी भरतीची परीक्षा आता MPSC घेणार, जाहिरात कधी निघणार?
लाडक्या बहिणींना ३ हफ्ते एकत्र मिळणार? (Ladaki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता रखडलेला आहे. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी देणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आता लाडक्या बहिणींना तिन्ही महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहे. एकाचवेळी खात्यात ४५०० रुपये जमा केले जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ईकेवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. सध्या लाभार्थ्यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लगेच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १६ मे रोजी अधिकारी मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा केले जातील.
अवश्य वाचा: ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक;राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोणाला पैसे मिळणार? (Ladaki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत फक्त ईकेवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही, त्यांचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसीत अजूनही दुरुस्ती केलेली नाही त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. आता लाडक्या बहिणींना रखडलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार आहेत.



