Guru Shukracharya Mandir : गुरू-शिष्य स्मारकाचे लोकार्पण; संजीवनी पार परिसराला नवसंजीवनी

Guru Shukracharya Mandir : गुरू-शिष्य स्मारकाचे लोकार्पण; संजीवनी पार परिसराला नवसंजीवनी

0
Guru Shukracharya Mandir : गुरू-शिष्य स्मारकाचे लोकार्पण; संजीवनी पार परिसराला नवसंजीवनी
Guru Shukracharya Mandir : गुरू-शिष्य स्मारकाचे लोकार्पण; संजीवनी पार परिसराला नवसंजीवनी

Guru Shukracharya Mandir : कोपरगाव : कोपरगाव (Kopargaon) बेट भागातील पवित्र आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर (Guru Shukracharya Mandir) परिसरात रविवारी भक्ती, संस्कृती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. मंदिर ट्रस्टच्या वतीने संजीवनी पार परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले. येथे उभारण्यात आलेल्या गुरू शुक्राचार्य महाराज आणि त्यांचे प्रिय शिष्य कचदेव यांच्या स्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

नक्की वाचा: मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा अपघातात मृत्यू

साधू-संत व भाविकांची उपस्थिती

सनई-चौघड्यांचा मंगल नाद, भगवंताच्या जयघोषाने भारलेले वातावरण, फटक्यांची आतिषबाजी आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. लोकार्पण सोहळ्याला उपस्थित भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचा उत्स्फूर्त आनंद लुटला. या सोहळ्यास महंत रमेशगिरी महाराज, महंत परमानंद महाराज, महंत राघवेश्वरगिरी महाराज आणि शारदानंदगिरीमाता यांच्यासह विविध क्षेत्रातील साधूसंत, भाविक भक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित संतांचे विधिवत संतपूजन करण्यात आले.

Guru Shukracharya Mandir : गुरू-शिष्य स्मारकाचे लोकार्पण; संजीवनी पार परिसराला नवसंजीवनी
Guru Shukracharya Mandir : गुरू-शिष्य स्मारकाचे लोकार्पण; संजीवनी पार परिसराला नवसंजीवनी

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुरू-शिष्य परंपरेला महत्व अधोरेखित (Guru Shukracharya Mandir)

भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, ज्ञान, निष्ठा आणि संस्कारांचे महत्व समाजासमोर अधोरेखित व्हावे या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आले आहे. गुरू शुक्राचार्य महाराज आणि कचदेव यांच्या नात्याची स्मृती जपणारे हे स्मारक भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

यावेळी साधूसंतांनी आपल्या प्रवचनातून गुरूचे जीवनातील स्थान विशद करत संस्कार, अध्यात्म आणि सदाचार जपण्याचे आवाहन केले. तसेच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात आले.

सुशोभीकरण, स्वच्छता, प्रकाशयोजना आणि नव्याने उभारण्यात आलेले स्मारक यामुळे संजीवनी पार परिसर आता धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. श्रद्धा, संस्कृती आणि इतिहासाला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम कोपरगावच्या वैभवात मोलाची भर घालणारा ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.