Board Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

0
Board Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Board Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Board Exam : नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुन-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाने पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर सुरू करण्यात येत आहे.

हेही वाचा : अहिल्यानगर शहराच्या पाणी आणि भुयारी गटार योजनांसाठी जागतिक बँकेकडून कर्जाचा प्रस्ताव

जाणून घ्या वेळापत्रक

राज्य मंडळाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित दहावी-बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, बारावीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान होणार आहे. तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान होईल. यात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचाही समावेश आहे. तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान होणार आहे.

नक्की पहा : ओबीसींना सवतीच्या लेकराची वागणूक का?; लक्ष्मण हाके यांचा फडणवीसांना सवाल

सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर (Board Exam)

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.