Madhi : मढी शिवारात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही

0
Madhi : मढी शिवारात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
Madhi : मढी शिवारात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

Madhi : पाथर्डी : तालुक्यातील मढी (Madhi) शिवारात आढळलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) शोध पत्रिका प्रसिद्ध करून नागरिकांना मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नक्की वाचा : हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या महंतांबद्दल केलेले शब्दप्रयोग निषेधार्ह : डॉ राधाकृष्ण विखे पाटील

एक अनोळखी पुरुष आजारी अवस्थेत आढळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (ता. ११) मढी शिवारात एक अनोळखी पुरुष आजारी अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी तत्काळ अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही (Madhi)

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून उंची सुमारे ५ फूट ५ इंच आहे. बांधा सडपातळ, रंग काळासावळा व केस काळे आहेत. उजव्या हातावर तीळ हे ओळखचिन्ह असून त्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट व चॉकलेटी रंगाची अंडरवेअर परिधान केलेली होती. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, या वर्णनाशी मिळतीजुळती कोणतीही व्यक्ती हरवलेली असल्यास किंवा संबंधित माहिती असल्यास नागरिकांनी पाथर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले आहे.